सहकारी सोसायटीतील असहकार

Posted by DK on December 14, 2013

उल्हास देशमुख vasturang@expessindia.com
Published: Saturday, December 14, 2013

'सहकारी गृहनिर्माण संस्था' हे नाव केवळ नावापुरतेच मर्यादित ठेवून प्रत्यक्षात सोसायटीतील अनेक लोकांचा अप्रत्यक्ष असहकारच सुरू असतो. त्यातूनच अनेक समस्याउद्भवतात.त्याविषयी..
 

कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे एकत्रित सुखी-समाधानी जीवन जगण्यासाठी सभासदांची स्थापन केलेली गृहनिर्माण संस्था. ही संस्था सुरळीत चालावी म्हणून  सरकारने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांनुसार सर्व सभासदांच्या संमतीनुसार कार्यकारी मंडळाची निवड केली जाते. हे कार्यकारी मंडळ आपल्या सोसायटीचा कारभार सुरळीत चालावा म्हणून वाहतूक, स्वच्छता, सौंदर्य या विषयी सर्वाच्या संमतीने जनरल बॉडी मीटिंगमध्ये काही नियम (इ८ छं६२) ठरवितात व ते सर्व रहिवाशांस बंधनकारक असतात. परंतु त्यांचे रहिवाशांकडून कळत नकळत उल्लंघन होते व त्यातून बरेच वाद निर्माण होतात. मग सोसायटीत राहण्याचे सुखसमाधान निघून जाते. काही प्रश्न असे असतात की त्यावर कितीही प्रयत्न केले तरी ते न सुटण्यासारखे असतात.

कार व टू व्हीलर पार्किंग : आज सोसायटी व्यवस्थापनाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कार व टू व्हीलर पार्किंग . इतर वाहनांस व रहिवाशांस येण्याजाण्यास अडथळे येऊ नयेत म्हणून पार्किंग जागा ठरविल्या जातात. त्याप्रमाणे 'नो पार्किंग'; 'हो पार्किंग' अशा पाटय़ा जागोजागी लावल्या जातात. पण काही सभासदांस आपल्या मर्जीनुसार व आपल्या सोयीनुसारच आपली गाडी पार्क करावयाची असते. यावरून वाद निर्माण होतात व त्यास चांगली सुशिक्षित माणसेही लहान मुलांप्रमाणे भांडताना दिसतात. काही वेळेस दोन हात करण्यापर्यंत वेळ येते. शेवटी चालले ते ठीक आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

सोसायटीच्या आवारात थुंकणे : जागोजागी थुंकणे हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. थुंकण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यास तीन कारणे आहेत. एकतर जागोजागी कचरा पडला आहे व घाणीचा दरुगध हवेत पसरला आहे. अशा वेळी माणसास थुंकण्याचीभावनानिर्माणहोते.दुसरे, काही टी.बी.सारखे रोग असल्यास रोग्यास थुंकावेसे वाटते. तिसरा सर्वात मोठा व प्रतिष्ठित वर्ग म्हणजे पान, तंबाखू, गुटखा खाणाऱ्यांचा. यांना थुंकणे अपरिहार्य असते. ते आपली थुंकी जिन्याच्या
भिंती, लिफ्ट, रस्ते, गार्डनमधील झाडे, कुंडय़ा येथे मोकळी करतात. ते डाग इतके भयानक असतात की पुष्कळ प्रयत्न करूनही ते निघत नाहीत. खरोखर अशा थुंकण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जसे रोग्यांना युरिनसाठी कॅथेटर वापरतात त्याप्रमाणे प्रतिष्ठितपणे व्यवस्थित वापरता येईल अशा कॅथेटरचा कोणी
शोध लावल्यास मोबाइलप्रमाणे ही मंडळी कॅथेटर ठेवून इतरांना त्रास न होता आपले व्यसन बाळगतील. नाहीतरी पूर्वी राजेरजवाडे यांच्याकडे पिकदाणी
प्रकार सर्रास वापरला जाई. भारतीय बाजारातही याला शुद्ध पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे चांगले मार्केट मिळेल.

धार्मिक ईश्वरी सेवा : सर्व धर्मात प्राणिमात्रांवर भूतदयेविषयी शिकवण असते. मग कोणी कबुतरांना दाणे घालून, कोणी कावळ्यांना फरसाण घालून सोसायटीत दृश्य जागी आपल्या धर्माचे पालन करीत असतात. त्यांच्या या धर्मामुळे साहजिकच या प्राण्यांचे सोसायटीत वास्तव्य असते. या प्राण्यांच्या विष्ठांमुळे काही रोग उद्भवतात. तसेच त्यांनी अर्धवट सोडून  दिलेले खाणे यावर मुंग्या, किडे, माश्या, उंदीर यांचीही पैदास होते. याची या सभासदांस कल्पना नसते, मग सोसायटी व्यवस्थापनाने स्वच्छतेसाठी केलेल्या नियमांचा बोजवारा उडतो. मग एकमेकांना दोष देत वाद निर्माण होतात व सोसायटीतील वातावरण बिघडते.
पाळीव प्राणी : काही सभासदांस घरात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळण्याचा छंद असतो. रोज सकाळी ही मंडळी कुत्र्यांना प्रातर्विधी करण्यासाठी सोसायटीच्या आवारात फिरावयास नेतात. मग ते आपले प्रातर्विधी कधी जिन्यात, तर कधी लिप्टमध्ये, तर कधी काही सभासदांच्या गॅलरी किंवा किचनसमोर उरकतात. काही सभासद मांजरे पाळतात ती काही सभासद महत्त्वाच्या कामास बाहेर पडताना नेमकी त्यांना आडवी जातात व त्यामुळे त्या सभासदांचे काम होत नाही या भावनेने मग पुन्हा एकमेकांत वादावादी होते.

गॅलरीतील गार्डन : काही सोसायटींत कॉम्प्लेक्समध्ये सुंदर गार्डन असूनही स्वत:च्या गॅलरीत कुंडय़ा ठेवून आपला गार्डन करावयाचा छंद काही सभासदांतील कुटुंबीयांना असतो. बरे हे सभासद कुंडीपॉटखाली ताटली किंवा भांडे ठेवून कुंडीला पाणी घालतील तर तसे नाही. सरळ पाइपने किंवा बादलीने ते झाडांना पाणी घालतात. त्यांच्या पाण्याचे मातीने भरलेले ओघळ खालील फ्लॅटधारकास किंवा खालून जाणाऱ्यांच्या अंगावर खुणा ठेवून जातात. पण गार्डन करणाऱ्यास त्याची कल्पना नसते किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

घरातील साफसफाई : घरातील साफसफाई करताना घरातील लाद्या, खिडक्या, ग्रिल्स बालदीने किंवा पाइपने पाणी टाकून खालील सभासदास त्रास होईल या पद्धतीने धुवू नयेत म्हणून सभेत सर्वानुमते ठराव पास केलेला असतो. तरीही साफसफाई करण्यासाठी काही सभासद नोकर लावतात. ते वरच्या मजल्यावरून डायरेक्ट पाण्याच्या पाइपने किंवा बालदीतून पाणी ओतून आपला फ्लॅट स्वच्छ करत असतात व ते घाण पाणी खालच्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये व ग्राऊंडवर पडून सोसायटीचा आवार किती घाण करतात याची त्या फ्लॅटधारकास कल्पना नसते. नुसत्या ओल्या फडक्यानेही काचा खिडक्या, गॅलरी धुता येते, परंतु ते पाणी ओतून आपले काम सोपे करतात.

फ्लॅटचे नूतनीकरण व फर्निचर : काही जणांना आपल्या फ्लॅटचा प्लॅन बदलून मिळालेल्या जागेचा जास्तीतजास्त एरिया वापरात आणावयाचा असतो. त्यासाठी सोसायटीचे सर्व नियम धाब्यावर बसवून असा काही बदल करतात की प्रत्यक्ष विश्वकर्मालाही मागे टाकतील. सोसायटीतील कार्यकारी मंडळास त्याकडे बघण्यास वेळ नसतो. तसेच एकदा फोडतोड केल्यानंतर उगाचच वाद वाढवून सभासदाची नाराजी ओढवून घेण्यात काही अर्थ नसतो.
या सर्व गोष्टींवर जनरल बॉडी मीटिंगमध्ये वारंवार चर्चा होतात. सर्वानुमते दंडात्मक कारवाई करण्यासाठी नियम बनविले जातात, ते सर्व सभासदांना मान्य होतात. परंतु घरी गेल्यावर सभासदांच्या घरच्या सर्वाना ते मान्य होत नाहीत. आपण एवढा करोड रुपये भरून फ्लॅट घेतला तेव्हा एवढेही स्वातंत्र्य आपणास नसावे. मग हे नॉन को-ऑपरेशन चालू राहते.
या सर्व प्रकारांमुळे मनात विचार येतो की खरंच हे 'को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी' हे नाव सार्थ आहे का? की नुसतेच 'हाऊसिंग सोसायटी'. विचारी मना तूच शोधोनी पाहे!
Categories:

Related Posts:

  • पदाधिकारी कशी मनमानी करतात वास्तु-मार्गदर्शन आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला. मी ८३ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आणि विधवा असून, ठाणे येथील गौतम टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटीत २० वर्षे राहत आहे. संस… Read More
  • वास्तूखरेदी आणि कुलमुखत्यारपत्र. वास्तूखरेदी आणि कुलमुखत्यारपत्र मालमत्ता खरेदी करताना आणि विकतानादेखील, शक्यतोवर असे कुलमुखत्यारपत्र अवश्य करावे. कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) हा या समस्येवरचा उत्तम आणि सुरक्षित उपाय ठरू शकेल. एखाद्या व्यक्तीने का… Read More
  • सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर. सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर.  आता तर महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्याला तिसरी दुरुस्ती केली आहे. अनेक सोसायटय़ांच्या सभासदांना सोसायटीच्या वतीने सत्यनारायण पू… Read More
  • ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’ ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’ लेबर कोर्टानेही सोसायटी उद्योग आहे असा दिलेला निर्णय रद्द केला. एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने, तिच्या एका सभासदाने आपल्या व्यवसायानिमित्त आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासा… Read More
  • सहकारी न्यायालय आणि तक्रार निवारण सहकारी न्यायालय आणि तक्रार निवारण महाराष्ट्र हे देशातील सहकार चळवळीत अत्यंत प्रगत असलेले राज्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांतील सभासदांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भात नक्की काय कृती करावी व सहकारी न्यायालयात कशी दाद मागाव… Read More