शेअर्स सर्टिफिकेट लॅमिनेट
करणे चुकीचे
कोरी शेअर सर्टिफिकेट जिल्हा हाऊसिंग फेडरेशनमध्ये ५० आणि २५
च्या रूपात विकत मिळतात.
शेअर
सर्टिफिकेट लॅमिनेशन करतात, अशा अनेक तक्रारी ठाणे हौसिंग
फेडरेशनकडे वारंवार येत असतात. शेअर सर्टिफिकेट हे सोसायटीत खरेदी केलेल्या
सदनिकेचा पुरावा असतो. तो जिवापलीकडे जपावा म्हणून त्याचे लॅमिनेशन केले जाते.
परंतु तसे करताना आपण शेअर सर्टिफिकेट निरुपयोगी करीत आहोत ही महत्त्वाची बाब ते
विसरतात. त्याचप्रमाणे आधारकार्डसुद्धा लॅमिनेट करू नये, असा
आदेश आधार प्राधिकरणाने जानेवारी २०१८ मध्ये काढला आहे.
कोरी शेअर सर्टिफिकेट जिल्हा हाऊसिंग
फेडरेशनमध्ये ५० आणि २५ च्या रूपात विकत मिळतात. या शेअर सर्टिफिकेटवरील मजकूर
कायदा आणि बायलॉज यांच्या तरतुदीनुसार छापलेला असतो. उदा. शेअर सर्टिफिकेटचा
क्रमांक, सभासदाचा रजिस्टर क्रमांक आणि एकूण खरेदी केलेल्या
शेअर्सची संख्या हा मजकूर लिहिलेला असतो. हे शेअर सर्टिफिकेट सभासदांना
देण्यापूर्वी फेडरेशन त्यामध्ये टाईप मजकूर लिहीत असते. सोसायटीच्या व्यवस्थापक
कमिटीच्या सभासदाला शेअर सर्टिफिकेटवर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत केले आहे, त्याच्या
नावाचा ठराव व्यवस्थापक कमिटीच्या मासिक सभेत ठराव पारित केला जातो. त्यानंतर हा
प्राधिकृत समिती सदस्य, फेडरेशनचे अध्यक्ष आणि मानद सचिव या
तिघांच्या स्वाक्षऱ्या केल्यावर आणि शेअर सर्टिफिकेटवर सोसायटीचा
शिक्का आणि संबंधित तिघांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर त्या शेअर सर्टिफिकेटला
वैधता प्राप्त होत असते. या स्वाक्षऱ्या शेअर सर्टिफिकेटच्या
मागीलभागावर असल्याने जेव्हा एखादा सभासद उपविधी क्रमांक ३८ नुसार आपल्या सदनिकेची
विक्री करतो म्हणजे खरेदीदाराचे नावे हस्तांतरित करीत असतो, तेव्हा
बायलॉज क्र. ३८ मधील सर्व मुद्यांचे तंतोतंत पालन केल्यावर व्यवस्थापक
हस्तांतरणाचा ठराव पारित करते. हा सर्व मजकूर सोसायटीच्या इतिवृत्तांतात समाविष्ट
असतो. तसेच तो शेअर सर्टिफिकेटच्या मागील बाजूस उद्धृत
केला जातो. त्यामध्ये समितीने हस्तांतरणाचा ठराव कोणत्या तारखेस मंजूर केला याची
माहिती असते आणि त्या खाली प्राधिकृत सभासद, अध्यक्ष आणि मानद सचिव या तिघांच्या
स्वाक्षऱ्या असतात व त्याखाली सोसायटीचा शिक्का व तारीख असते. अशा परिस्थितीतील शेअर
सर्टिफिकेट लॅमिनेशन केले गेले तर त्याच्या दोन्ही बाजूवर लिहिता येणे शक्य
नसते. तसेच लॅमिनेशनवरील मजकूरसुद्धा वाचता येत नसतो. या कारणास्तव शेअर
सर्टिफिकेट लॅमिनेट करू नये. कारण तसे केल्यास ते निरुपयोगी होईल आणि
डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट घेण्यावाचून गत्यंतर नसते. त्यासाठी संबंधित सभासदाने
सोसायटीच्या नावे सुधारित बायलॉज क्र. ९ (१) आणि (२) यामध्ये केलेल्या
मार्गदर्शनाप्रमाणे, पोलिसांकडे तक्रार करावी. त्याची प्रमाणित प्रत
आणि प्रतिज्ञापत्र सोसायटीला द्यावे. अर्थात ही उपाययोजना गहाळ शेअर
सर्टिफिकेटबाबत असली तरी, शेअर सर्टिफिकेट लॅमिनेट केल्यामुळे ते
निरुपयोगी झालेले असते, म्हणून अशा स्थितीत पोलिसांकडे तक्रार
करण्याऐवजी, शेअर सर्टिफिकेट लॅमिनेट केल्याने ते
निरुपयोगी झाले असे पोलिसांना कळवावे.
शेअर
सर्टिफिकेट गहाळ झाल्यावर किंवा ते लॅमिनेट केले गेले असेल तर हा
कल्लीिेल्ल्र३८ इल्ल िसोसायटीला द्यावा लागतो याची जाणीव सर्व सभासदांनी ठेवली
पाहिजे.
आधारकार्ड
लॅमिनेट का नको?
आधारकार्ड लॅमिनेशन करू नये, असे
परिपत्रक आधार प्राधिकरणाने काढले आहे. याचे कारण ते लॅमिनेट केल्यास त्यावरील
क्यूआर कोडची पडताळणी करण्यास अडचण येऊ शकते. तसेच अशा लॅमिनेट केलेल्या
आधारकार्डातील माहितीची चोरी होऊ शकते असेही प्राधिकरण म्हणते. आतापर्यंत शेअर
सर्टिफिकेट गहाळ झाले किंवा लॅमिनेशन किंवा अन्य काही कारणांमुळे निरुपयोगी
झाले तर सभासद २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हानीरक्षण बंधपत्र (इंण्डेम्निटी
बॉण्ड) सोसायटीला देत असे; परंतु सुधारित उपविधी क्र. ९ (१) आणि
(२) नुसार भागपत्र गहाळ झाले असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्रत व
या संबंधातील शपथपत्र सोसायटीला द्यावे लागेल. ही महत्त्वाची सुधारणा आहे.
मात्र आधारकार्ड काही कारणांमुळे निरुपयोगी झाले असेल
तर दुसरे आधारकार्ड मिळविण्यासाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरू करावी लागेल.
– मुख्य
कार्यकारी अधिकारी, दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप.हौसिंग
फेडरेशन लि.
नंदकुमार रेगे | Updated: April 14, 2018 12:06 AM