पदाधिकारी कशी मनमानी करतात

Posted by DK on December 03, 2018

वास्तु-मार्गदर्शन

आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला.


मी ८३ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आणि विधवा असून, ठाणे येथील गौतम टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटीत २० वर्षे राहत आहे. संस्थेने नवीन शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी जुने शेअर सर्टिफिकेट मागून घेतले आणि या गोष्टीला आता आठ महिने झाले आहेत; अद्याप ते शेअर सर्टिफिकेट देत नाहीत, तसेच माझ्या विनंतीला-पत्राला ते दाद देत नाहीत. खरेदीच्या साखळी प्रक्रियेतील एक करारनामा नसल्यामुळे आम्ही नवीन शेअर सर्टिफिकेट देत नाही, असे सांगितले जाते. याबाबत उपनिबंधक यांच्यामार्फतही मी पत्रव्यवहार केला.
ही दोन पत्रे अध्यक्षांना पाठवली, पण त्याचीही दखल घेतली गेली नाही.
इंदुमती कुलकर्णी, नौपाडा, ठाणे.
आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला. खरे तर कोणत्याही कारणास्तव संस्थेचे पदाधिकारी कुणाचेही भाग प्रमाणपत्र अडकवून ठेवू शकत नाहीत अथवा भाग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करू शकत नाहीत. आपल्याजवळ जर उपनिबंधकांनी दिलेले (भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीचे) आदेश असतील तर आपण उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या सहीने भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधी विनंती करावी आणि त्यांनी सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. उपनिबंधक स्वत: संस्थेचे दप्तर ताब्यात घेऊन अशा प्रकारे शेअर सर्टिफिकेट देऊ शकतात.
हेही शक्य न झाल्यास संस्थेला एक कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याविरुद्ध सहकार न्यायालयात अथवा दिवाणी न्यायालयात दाद मागता येईल.
अ‍ॅड. श्रीनिवास घैसास | December 1, 2018 02:03 am / LOKSATTA / Vasurang

अ‍ॅड. श्रीनिवास घैसास
ghaisas2009@gmail.com


Categories:

Related Posts:

  • सोसायटी व्यवस्थापन : सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सध्या राज्यात मोकळ्या भूखंडाची उपलब्धता नसल्याने पूर्वी स्थापन झालेल्याच संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अंतर्गत राज्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचे कामकाज चालवल… Read More
  • त्यांची मालमत्ता आयुक्तांनीच सील करावी वास्तु-प्रतिसाद :  त्यांची मालमत्ता आयुक्तांनीच सील करावी सोसायटीमार्फत पुरविलेल्या सुविधांचाही थकबाकीदार पुरेपूर फायदा घेतात. सोसायटी स्थापन झाल्यापासूनच सोसायटीत राहणारे सर्व सभासद एकत्र रक्कम जमा करून मेन्… Read More
  • पोट भाडेकरू (Leave & Licences) पोट भाडेकरू (Leave & Licences) आमच्या सोसायटीमधील काही सदस्य आपले फ्लॅट भाडय़ाने देतात. परंतु भाडे करारपत्र व्यवहार केला तरी प्रत सोसायटी कमिटीला देत नाहीत. तर काही सदस्य रजिस्ट्रेशन प्रत बनवून घेत नाही. त्याकरिता काही … Read More
  • गाळयाचे हस्तांतरण कायद्यानेच! गाळयाचे हस्तांतरण कायद्यानेच! हस्तांतर करण्याच्या सभासदाचा तो गाळा किमान एक वर्ष मालकीचा असला पाहिजे. गाळयाच्या हस्तांतरासाठी सोसायटीचा ‘ना हरकत’ दाखला लागत नसला तरी हस्तांतर करणाऱ्या सभासदाने आणि तो विकत घे… Read More
  • गृहनिर्माण संस्थेचं ‘पथ्यपाणी’ कुणी सांभाळायचं? सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या गृहनिर्माण संस्थेमध्ये याची गरज अधिक असते.   गृहनिर्माण संस्थेत कार्यरत असणाऱ्या कार्यकारिणीच्या कार्यपद्धतीवर जरूर लक्ष असावं; नव्हे तो सभासदांच्या कर्तव्याचाच भाग आहे. पदाधिका… Read More