त्यांची मालमत्ता आयुक्तांनीच सील करावी

Posted by DK on June 18, 2018

वास्तु-प्रतिसाद :  त्यांची मालमत्ता आयुक्तांनीच सील करावी
सोसायटीमार्फत पुरविलेल्या सुविधांचाही थकबाकीदार पुरेपूर फायदा घेतात.

सोसायटी स्थापन झाल्यापासूनच सोसायटीत राहणारे सर्व सभासद एकत्र रक्कम जमा करून मेन्टेनन्सद्वारे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर हे जागेच्या मूळ मालकाच्या नावानेच वर्षांनुवर्षे भरत असतात! परंतु काही थकबाकीदार मात्र सोसायटीत राहूनसुद्धा जाणूनबुजून सोसायटीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करून वर्षांनुवर्षे सोसायटीचा मेन्टेनन्स भरत नाहीत. खोटय़ा तक्रारी सोसायटीविरुद्ध करून सोसायटीला बदनाम करतात! सोसायटीमार्फत पुरविलेल्या सुविधांचाही थकबाकीदार पुरेपूर फायदा घेतात. सोसायटीच्या कामात व्यत्यय आणून नवीन येणाऱ्या सभासदांना चिथावणी देऊन एकमेकांत मतभेद निर्माण करतात. सरकारी कार्यालयात इतर सभासदांनी तक्रारी सोसायटीमार्फत करूनसुद्धा थकबाकीदार सभासदांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही! त्यामुळे वर्षोनुवर्षे प्रामाणिकपणे मेन्टेनन्स भरणाऱ्या सभासदांनाच अधिक भरुदड सोसावा लागतो! याचा विचार करून आता पुढील काळात मेन्टेनन्स थकविणाऱ्यांच्या मालमत्ता सरकारतर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांनीच सक्तीने सील करणे ही काळाजी गरज आहे. जेणेकरून सोसायटींतील थकबाकीदार सभासदांवर चाप बसेल आणि सोसायटय़ा चांगल्या स्थितीत सुरक्षित राहू शकतील.
– दीपक दत्तात्रय प्रधानठाणे (प.)

Categories:

Related Posts:

  • बक्षीसपत्र भाग 01 जादा मुद्रांक शुल्क अथवा नोंदणी फी भरण्याची आवश्यकता भासत नव्हती.  || धनराज खरटमल बक्षीसपत्र अथवा दानपत्रासाठी दिनांक २४ एप्रिल २०१५ रोजीच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम-१९५८ चे अनुसूची … Read More
  • सहकारी संस्था पुनर्विकास – नवीन शासननिर्णय नवीन निर्देशानुसार जी इमारत धोकादायक जाहीर झाली असेल, त्या संस्थेच्या पुनर्विकासाचा निर्णय त्या संस्थेची सर्वसाधारण सभा घेऊ शकेल. लोकसत्ता टीम | August 10, 2019 12:27 am अ‍ॅड. तन्मय केतकर शहरी भागातील मोकळ्य… Read More
  • स्थावर मालमत्ता हस्तांतरणाचा सोपा मार्ग. हस्तांतरणाच्या अनेक मार्गापैकी या एका उपायाचा म्हणजेच हक्कसोडपत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत. लोकसत्ता टीम | August 24, 2019 01:51 am अ‍ॅड. श्रीनिवास घैसास सध्या स्थावर मालमत्ता हस्तांतरित करणे म्हणजे एक दिव… Read More
  • सदनिकेचा आकार आणि देखभाल शुल्क संस्थेमध्ये उद्भवणाऱ्या वादापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटेनन्स अर्थात देखभाल शुल्क. लोकसत्ता टीम | September 7, 2019 12:14 am अ‍ॅड. तन्मय केतकर tanmayketkar@gmail.com सहकारी गृहनिर्माण संस्था हा… Read More
  • वाद टाळण्यासाठी संस्थेच्या उपविधिचे कसोशीने पालन! गृहनिर्माण संस्थेतील प्रत्येक सदस्याने आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वात प्रथम काय केले पाहिजे तर गृहनिर्माण संस्थेचे उपविधि हे वाचून काढले पाहिजेत.   सर्वसाधारण माणसांचे आजकालचे घराचे स्वप्न म्हणजे स्वत:च्या मालकीची सदनिका अ… Read More