आम्हीच ज्ञानी-अगाध ज्ञान आमुचे!

Posted by DK on April 19, 2022
सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! 

सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळे, काही वेळा विक्षिप्त, विचित्र असे अनुभव पहायला, ऐकायला मिळतात. त्यातील एक : ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेमधील ही खरी घटना आहे. फ्लॅटमध्ये सुरू झालेली गळती वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारकाच्या निदर्शनास आणून दिली असता प्रथमत: ती मान्यच करण्यात आली नाही, होत असलेली गळती आमच्याकडून नाहीच असा ठाम पवित्रा घेतला गेला. गळतीचं गंभीर स्वरूप दुसऱ्यांदा निदर्शनास आणून दिले असता मी सिव्हिल इंजिनीअर आहे, कुठून गळती होत आहे हे मला चांगलं माहीत आहे, तुम्ही खाली सिमेंट लावून घ्या अशी मुक्ताफळे उधळण्यात या आडमुठय़ा सदस्याचा हात! आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी याची जाणीव अशा आडमुठय़ा सदस्यांना नसावी याचंच वैषम्य वाटतं. सरतेशेवटी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचं सूतोवाच करण्यात येताच अशा आडमुठय़ा व उर्मट सदस्याचं डोकं ठिकाणावर येतं, मुळात अशी पाळी आपल्यावर येणार नाही याची दक्षता आधी घेतली असती तर ही वेळच आली नसती. असो, वेळेवर जाग आली हेही नसे थोडके! 

 अनेक गृहनिर्माण संस्थांमधल्या अशा आडमुठय़ा सदस्यांकडून समस्या जाणीवपूर्वक निर्माण होत असल्याची असंख्य उदाहरणे सापडतील. यापूर्वी कन्सिल्ड पाइिपग करताना जीआय पाईपचा वापर होत असे, कालांतराने पाइपचे थ्रेड गंजल्याने त्यातून गळती होत असे, पण आता चांगल्या दर्जाचे प्लास्टिक पाइप उपलब्ध असल्याने उत्तम प्रकारे काम करता येते. पाइप कोणताही असो, कायद्यानुसार ज्याच्या घरातून गळती होत आहे त्यानेच ती गळती कायमस्वरूपी थांबवायची आहे. ज्याच्या घरात गळती होत आहे त्याच्याकडून खर्चाची कोणतीही मागणी करता येत नाही. ज्या सभासदाच्या घरातून गळती होते त्या सभासदाला त्रास होत नसला तरी ती गळती कोणताही आडपडदा न ठेवता त्वरित थांबवावी. कारण खाली राहणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच, शिवाय स्लॅबमधून गळती झाल्याने स्लॅबचं स्ट्रक्चर खराब झाल्यास इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी संपूर्ण इमारत खाली करण्याची पाळी बाकीच्या सभासदांवर केव्हाही येऊ शकते म्हणून प्रथम आपल्या इमारतीचं स्ट्रक्चर सुरक्षित कसं राहील हे पाहणं आपणा सर्वाचं कर्तव्य असलं पाहिजे. घरामध्ये गळती होते ती म्हणजे चुकीचं कन्सिल्ड, टॉयलेट, बाथरूम व कीचनचं नानी ट्रॅप. या नानी ट्रॅपची दर दोन वर्षांनी प्लंबरकडून घोटाई करून घेतल्यास नानी ट्रपमधून गळतीची समस्या उद्भवत नाही. नानी ट्रॅपला घोटाई करण्यासाठी फारसा खर्च येत नाही, मात्र ती वेळेवर व्हायला हवी. राहता राहिला प्रश्न नूतनीकरणाचा! एकदा नूतनीकरण झाल्यानंतर दीर्घकाळ ही समस्या उद्भवत नाही; नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाएवढी रक्कम लगेच फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यास आवश्यकता भासल्यास नूतनीकरणाच्या खर्चाचा भार मोठय़ा प्रमाणात हलका होण्यास मदत होईल. मात्र आठवणीकरिता नूतनीकरण अशी नोंद असावी (आता डिजी लॉकर्स हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे ) म्हणजे पुढील नूतनीकरणापर्यंत मुदत वाढवता येते. अशा प्रकारे नियोजन करून सहकार्य केल्यास आपल्याबरोबर इतरांचाही आनंद द्विगुणित होईल. समाधान व लक्ष्मी, दोघांचंही वास्तव्य आपणाकडे राहो, ही सदिच्छा. 

 Written by लोकसत्ता टीम राजन बुटाला February 19, 2022 2:05:46 am
Categories:

Related Posts:

  • ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’ ‘सहकारी गृहनिर्माण सोसायटी उद्योग नव्हे’ लेबर कोर्टानेही सोसायटी उद्योग आहे असा दिलेला निर्णय रद्द केला. एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने, तिच्या एका सभासदाने आपल्या व्यवसायानिमित्त आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासा… Read More
  • वास्तूखरेदी आणि कुलमुखत्यारपत्र. वास्तूखरेदी आणि कुलमुखत्यारपत्र मालमत्ता खरेदी करताना आणि विकतानादेखील, शक्यतोवर असे कुलमुखत्यारपत्र अवश्य करावे. कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) हा या समस्येवरचा उत्तम आणि सुरक्षित उपाय ठरू शकेल. एखाद्या व्यक्तीने का… Read More
  • सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर. सोसायटय़ांतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटय़ांचा निधी वापरणे बेकायदेशीर.  आता तर महाराष्ट्र शासनाने विद्यमान सहकार कायद्याला तिसरी दुरुस्ती केली आहे. अनेक सोसायटय़ांच्या सभासदांना सोसायटीच्या वतीने सत्यनारायण पू… Read More
  • पदाधिकारी कशी मनमानी करतात वास्तु-मार्गदर्शन आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला. मी ८३ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आणि विधवा असून, ठाणे येथील गौतम टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटीत २० वर्षे राहत आहे. संस… Read More
  • सहकारी न्यायालय आणि तक्रार निवारण सहकारी न्यायालय आणि तक्रार निवारण महाराष्ट्र हे देशातील सहकार चळवळीत अत्यंत प्रगत असलेले राज्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांतील सभासदांनी त्यांच्या तक्रारीसंदर्भात नक्की काय कृती करावी व सहकारी न्यायालयात कशी दाद मागाव… Read More