सदनिकेत / दुकानात दुरुस्तीचे काम करताना घ्यावयाची दक्षता

Posted by DK on January 09, 2018
Swaroop Co- op. Housing society Ltd.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सदनिकेत / दुकानात दुरुस्तीचे काम करताना  घ्यावयाची दक्षता

विषय : आपण आपल्या सदनिकेत / दुकानात करत असलेल्या दुरुस्ती बाबत .
महोदय ,
खालील अटी शर्ती च्या अधीन राहून आपणास आपल्या सदनिकेत दुरुस्ती कामादरम्यान घ्यावयाची दक्षता.
१) उपविधी क्र. ४६ (अ) नुसार आपणास जादा बांधकाम किंवा त्यात फेरबदल करता येणार नाही.
२) उपविधी क्र. ४८ (अ) नुसार कोणताही  सद्स्य आपल्या सदनिकेत इतर सद्स्यांना गैरसोयीचे , उपद्रवकारक व त्रास होईल असे कृत्य करणार  नाही .
३) सदनिकेत / दुकानात दुरुस्तीचे काम चालू असताना :
क) सदनिकाधारकाची  उपस्थिती असणे आवश्यक आहे.
ख) दुपारी 2 ते 4 या वेळेत जोर जोराने आवाज करणारी उपकरणे तोड काम करणे कामगारांनी     मोठ्या आवाजात बोलणे – हसणे यावर निर्बंध घातलेले आहेत .
ग) काम चालू असताना उडणारी धूळ इमारतीच्या मोकळ्या जागेमध्ये इतरत्र पसरलेली असते त्याची दररोज साफसफाई  करणे  आवश्यक आहे . रंगकामफर्निचर  किंवा इतर कामात  दुर्गंधीयुक्त रसायने वापरण्यास अनुमती नाही.
घ) दुरुस्तीचे सामान ने- आण करताना सोसायटीच्या इमारतीस किंवा आजूबाजूच्या सदनिकेस हानी पोहचणार नाही याची दक्षता सद्स्यांने  घ्यावयाची आहे . काही हानी नुकसान झाल्यास सद्स्यांने त्याची नुकसान भरपाई स्वखर्चाने द्यावयाची आहे.
च )अवजड  असलेली उपकरणे , सामान  , बांधकाम साहित्य (वाळू ,सिमेंट, विटा ) सोसायटीच्या लिफ्ट मधून ने- आण करणेस सक्त मनाई आहे.
छ) इमारतीच्या बाह्य बाजूस सपाट भिंतीवर खिळे ,ब्रॅकेट , लावू नये केबल , पाईप आत घेण्यासाठी छिद्र करू नये , खिडक्यांची ग्रील्स भिंतीवर लटकल्यासारखे लावू नये .
ज) सोसायटीची देय रकमेची थकबाकी पूर्ण भरल्यानंतरच दुरुस्ती कामास सुरुवात करावी .
झ)  दुरुस्ती कामाकरिता वीज जोडणी स्वतःच्या मीटर मधूनच घ्यावी सामाईक मीटर मधून घेतल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .
त ) दुरुस्तीचे  काम चालू असताना शिल्लक राहिलेले सामान , सदनिकेतील जुने सामान , डेब्रिज , सोसायटीच्या आवारातून त्वरित काढून टाकणे आवश्यक आहे . काम पूर्ण झाल्यापासून १५ दिवसांत काढून टाकले नाही तर सोसायटी काढून टाकील व आलेल्या खर्चाची दुप्पट रक्कम सदनिकाधारकाकडून वसूल करण्यात येईल .
थ )उपविधी क्र. १६५ अन्वये संस्थेच्या उपविधीतील तरतुदींचा भंग केला आहे असे आढळल्यास संस्था एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एकत्रित पणे रु. ५०००/- रकमेचा दंड आकारील .
द ) वरील अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास दुरुस्तीचे काम थांबविण्याचे व दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाचे असतील .


                                                                                                अध्यक्ष                      सेक्रेटरी

मी श्री .................................................. सदनिका / दुकान क्रमांक :............... वरील अटी व शर्ती वाचल्या असून त्त्यांचे काटेकोरपालन करेन . त्याचे उल्लंघन झाल्यास माझी दंड भरण्याची तयारी हे.
  



सदनिकाधारक


Categories:

Related Posts:

  • खरे अपराधी कोण? खरे अपराधी कोण? ‘वास्तुरंग’ (१० जून) पुरवणीत अरविंद चव्हाण यांचा ‘गृहनिर्माण संस्थेतील गोंधळी सभासद’ हा लेख वाचला. लोकसत्ता टीम | Updated: July 15, 2017 1:57 AM ‘गोंधळी’ सभासद की समिती? ‘वास्तुरंग’ (१० ज… Read More
  • गृहनिर्माण संस्थेकडून हवी ती कागदपत्रे कशी मिळवाल? गृहनिर्माण संस्थेकडून हवी ती कागदपत्रे कशी मिळवाल? सर्वोच्च न्यायालयाने शासनाकडून भरपूर मदत घेत नसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहिती अधिकाराचा फायदा लागू डॉ. एम. डी. पाटील | Updated: September 16, 2017 2:19 AM… Read More
  • अधिमंडळाची वार्षिक बैठक : कार्यपद्धती अधिमंडळाची वार्षिक बैठक : कार्यपद्धती अधिमंडळाची वार्षिक बैठक :  अधिनियमानुसार पाळावयाची कार्यपद्धती विश्वासराव सकपाळ | Updated: September 2, 2017 2:19 AM अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीच्या अनुषंगाने अधिनियमा… Read More
  • सोसायटय़ा व सभासद जीएसटीच्या कक्षेत सोसायटय़ा व सभासद जीएसटीच्या कक्षेत देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये वित्तीय बदल आणण्यात योगदान देणारी करप्रणाली अशीही पुस्ती जोडण्यात येत आहे. विश्वासराव सकपाळ | Updated: July 29, 2017 1:16 AM सहकारी गृहनिर्माण संस्थ… Read More
  • गृहनिर्माण संस्थेतील ‘गोंधळी’ सभासद गृहनिर्माण संस्थेतील ‘गोंधळी’ सभासद गोंधळी वृत्तीच्या सभासदांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भाव अधिक प्रमाणात दिसून येत असतात. अरविंद चव्हाण | Updated: June 10, 2017 5:13 AM गोंधळी वृत्तीच्या सभासदा… Read More